Teacher Transfer

Online Test Std 3

Pages

Pages

Pages

Pages

बाल वैज्ञानिक स्पर्धा



शालेय स्पर्धा परीक्षा - होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा


कोण सहभागी होवू शकतात - इयत्ता सहावी व नववी मध्ये शिकणारे विद्यार्थी

Medium :- English, Semi-English and Marathi 
Boards :- All Boards (SSC / CBSE / ICSE / IB etc.)

स्पर्धेचे स्तर:-


पहिलास्तर: लेखी स्पर्धा
दुसरास्तरप्रात्यक्षिक स्पर्धा
तिसरा स्तर: A प्रत्यक्ष मुलाखत
                     B कृतीसंशोधन प्रकल्प
स्पर्धेचे स्वरूप:

पहिला स्तर: परीक्षेचा पहिला स्तर हा लेखी परीक्षेचा असतो. यात विज्ञान आणि विज्ञानातील सामान्यज्ञानावर आधारित १०० वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. यासाठी ९० मिनिटांचा वेळ दिला जातो.
दुसरास्तर:
दुसऱ्या स्तरासाठी निवड करताना: प्रथम येणाऱ्या ७.५ विद्यार्थ्यां ची दुसऱ्या स्तरासाठी निवड केली जाते व त्यांना मेरीट सर्टिफिकेट दिले जाते. उरलेल्या पैकी पास विद्यार्थ्यांना पासिंग सर्टिफिकेट दिले जाते.दुसरा स्तर: दुसरा स्तर हा प्रात्यक्षिक स्पर्धेचा असतो. यामध्ये;वर्ग ६ वा: ही परीक्षा ३० गुणांचीअसते. यात सामान्यज्ञानावर ५ प्रात्यक्षिके करून दाखवावी लागतात. प्रत्येकी ६ गुण असतात. वेळ ३० मिनिटे म्हणजेच एका प्रात्यक्षिकासाठी ६ मिनिटे वेळ असेल.वर्ग ९ वा: ही परीक्षा ३० गुणांचीअसते. यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयाची प्रत्येकी एक प्रात्यक्षिके असतात. यासाठी प्रत्येकी दहा गुण एका प्रात्यक्षिकासाठी दहा मिनिटे याप्रमाणे 30 मिनिटे वेळ असेल.

तिसऱ्या स्तरासाठी निवड करताना: पहिल्या स्तरातील मिळालेल्या गुणांपैकी ३०% आणि दुसऱ्या स्तरातील मिळालेल्या गुणांनुसार निवड करतात. यात प्रथम येणाऱ्या १० % विद्यार्थ्यांची निवड तिसऱ्या स्तरासाठी केली जाते.
तिसरा स्तर:
तिसरा स्तर: तिसऱ्या स्तरांमध्ये दोन टप्पे असतात. A प्रत्यक्ष मुलाखत,:यासाठी 30 गुणांची मुलाखत घेतली जाते. वेळ पाच ते दहा मिनिटांचा असतो. कृती संशोधन प्रकल्प: यासाठी 30 गुण ठेवलेले आहेत. वेळ पाच ते दहा मिनिट असतो. अंतिम निकाल: यामध्ये पहिल्या स्तरातील30% गुण+दुसऱ्या स्तरातील गुण + तिसऱ्या स्तरातील गुण यावरून निकाल ठरवण्यात येतो. प्रथम येणाऱ्या 10% विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र व त्यासोबत रुपये3000 शिष्यवृत्ती देण्यात येते. पुढील60% विद्यार्थ्यांना रौप्य पदक आणि प्रमाणपत्र व त्यासोबत रुपये 2000शिष्यवृत्ती देण्यात येते.आणि उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कास्य पदक व प्रमाण पत्र त्यासोबत रुपये 1000 रु शिष्यवृत्ती देण्यात येते.
Sources : Internet
BPEGM



No comments:

Post a Comment